Gharkul Yojana 2025 स्वतःचे हक्काचे घर असावे ही प्रत्येकाची इच्छा असते, पण आर्थिक अडचणींमुळे अनेकांचे हे स्वप्न पूर्ण होत नाही. यासाठी शासनाच्या घरकुल योजनांद्वारे घर बांधण्यासाठी अनुदान दिले जाते. या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी अर्जदाराचे नाव घरकुल यादीत असणे आवश्यक असते. या यादीत नाव नोंदवण्यासाठी एक ठरावीक प्रक्रिया पार पाडावी लागते.
घरकुल योजनेचा लाभ मिळण्यासाठी पात्रता निकष ठरवलेले असतात. या पात्रतेनुसारच संबंधित व्यक्तीला या योजनेचा लाभ मिळतो. पात्रतेनंतर घरकुल योजनेसाठी सर्व्हे केला जातो आणि त्या सर्व्हेच्या आधारावर पात्र लाभार्थ्यांची नावे यादीत समाविष्ट केली जातात. जर तुमचे नाव या यादीत आले, तर तुम्हाला घर बांधकामासाठी अनुदान मिळण्याचा मार्ग खुला होतो.
Gharkul Yojana 2025 सर्व्हेची प्रक्रिया
घरकुल योजनेचा सर्व्हे आता पूर्णपणे ऑनलाईन पद्धतीने करण्यात येत आहे. त्यामुळे अर्जदारांना आता मोबाईलद्वारेही सर्व्हे करता येतो. ऑनलाईन प्रक्रिया जलद आणि सोपी असल्यामुळे लाभार्थ्यांना अनुदान मिळण्याची प्रक्रिया देखील सुलभ झाली आहे.
ऑनलाईन घरकुल सर्व्हे करण्यासाठी सर्वात आधी तुम्हाला गुगल प्ले स्टोअरमधून AwaasPlus 2024 हे ॲप्लिकेशन डाउनलोड करावे लागेल. तसेच, ई-केवायसी करण्यासाठी AadhaarFace RD हे ॲप्लिकेशनही इन्स्टॉल करणे आवश्यक आहे. AwaasPlus 2024 ॲप्लिकेशन ओपन केल्यानंतर आधार क्रमांक टाकून Authenticate या बटनावर क्लिक करा. त्यानंतर AadhaarFace RD ॲप्लिकेशन ओपन होईल आणि त्याद्वारे तुमची ई-केवायसी पूर्ण केली जाईल.
📢 हे पण वाचा :- घराचं स्वप्न पूर्ण होणार! PM आवास योजनेतील या 10 निकषांवर घर अन् 1.20 लाखांची मदत
यानंतर राज्य, जिल्हा, तालुका आणि गाव यांची निवड करून Next या बटनावर क्लिक करा. पुढे एक फॉर्म ओपन होईल, त्यामध्ये आवश्यक ती माहिती भरा. एकदा फॉर्म पूर्ण झाल्यावर तुमचा घरकुल सर्व्हे पूर्ण होतो. या संपूर्ण प्रक्रियेसाठी इंटरनेट कनेक्शन आवश्यक आहे.
घरकुल सर्व्हे नंतर मिळणारा लाभ
ऑनलाईन सर्व्हे पूर्ण केल्यानंतर एक वर्षाच्या आत तुमचे नाव घरकुल यादीमध्ये समाविष्ट होऊ शकते. यादीत नाव आल्यानंतर तुम्हाला घरकुल योजनेचा लाभ मिळण्याची प्रक्रिया सुरू होते. ग्रामीण भागातील अनेक नागरिक अजूनही स्वतःच्या घराच्या प्रतीक्षेत आहेत. शासनाच्या घरकुल योजनांमुळे गरजू आणि पात्र लाभार्थ्यांना घर बांधण्यासाठी अनुदान दिले जाते.
केवळ घर बांधकामासाठी अनुदानच नव्हे, तर घर बांधण्यासाठी जागा नसेल तर जागा देखील उपलब्ध करून दिली जाते. घर बांधकामासाठी लागणारे वाळू आणि इतर साहित्यदेखील शासनामार्फत दिले जाते. त्यामुळे अनेक गरजू कुटुंबांचे घराचे स्वप्न साकार होऊ शकते.
ग्रामीण भागात अजूनही या योजनांची माहिती पुरेशी पोहोचलेली नसल्यामुळे अनेक पात्र नागरिक या योजनेपासून वंचित राहतात. त्यामुळे घरकुल योजनेबाबत जागरूकता निर्माण करणे आणि अर्ज प्रक्रिया समजून घेणे खूप आवश्यक आहे.