Sheli Gat Vatap 2025 शेळी गट गाय म्हैस कुक्कुटपक्षी अनुदानासाठी ऑनलाईन अर्ज सुरु

Sheli Gat Vatap शेळी गट वाटप 2025 योजना तसेच इतर पशुपालन योजनांसाठी ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे. या योजनांमध्ये कोणकोणत्या योजना समाविष्ट आहेत आणि अर्ज कसे करायचे याची सविस्तर माहिती आपण या लेखामध्ये जाणून घेणार आहोत. नावीन्यपूर्ण योजना अंतर्गत जिल्हास्तरीय आणि राज्यस्तरीय दुधाळ गाई, म्हशी तसेच शेळी गट वाटप 2025 या वर्षासाठी ऑनलाईन अर्ज सुरू झाले आहेत. या योजनेसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 2 जून 2025 आहे.

योजनेचा उद्देश आणि पात्रता

शेळी गट वाटप योजना, गाई-म्हैस मांसल कुक्कुटपक्षी वाटप योजनेचा लाभ घेण्यासाठी काही पात्रता निकष ठेवण्यात आले आहेत. अर्जदार सुशिक्षित बेरोजगार युवक, अल्पभूधारक शेतकरी किंवा महिला बचत गटाचे सदस्य असावेत. या योजनांचा उद्देश बेरोजगार तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे हा आहे.

Sheli Gat Vatap योजनांचा लाभ कसा मिळेल?

अनेक तरुणांना शेतीसोबत जोड व्यवसाय म्हणून शेळी पालन, दुग्ध व्यवसाय किंवा कुक्कुटपालन करण्याची इच्छा असते. परंतु आर्थिक भांडवलाची कमतरता असल्यामुळे अनेकांना हे शक्य होत नाही. यामुळे महाराष्ट्र शासनाच्या पशू संवर्धन विभागाने शासकीय अनुदानावर दोन गाई, दोन म्हशी, शेळी गट किंवा मांसल कुक्कुटपक्षी वाटप करण्याचा निर्णय घेतला आहे.

अनुदानाचे स्वरूप

गाई आणि म्हशींसाठी अनुदानाचे स्वरूप ठरवलेले आहे. संकरीत गाईसाठी प्रती गाय 70 हजार रुपये अनुदान दिले जाते, तर दोन गाईंसाठी 1 लाख 40 हजार रुपये मिळतात. यामध्ये 18 टक्के जीएसटी आणि 10.20 टक्के विमा समाविष्ट आहे. म्हशींसाठी एका म्हशीला 80 हजार रुपये मिळतात. अर्जदार खुल्या प्रवर्गातील असल्यास 50 टक्के हिस्सा भरावा लागतो, अनुसूचित जाती-जमाती प्रवर्गातील लाभार्थ्याला मात्र 25 टक्केच हिस्सा भरावा लागतो.

📢 हे पण वाचा :- आता या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात पिक विमा पैसे जमा तुम्हाला मिळाले का ?

शेळी गट वाटप योजनेंतर्गत अनुदान

शेळी गट वाटप योजनेंतर्गत 10 शेळ्या आणि एक बोकड किंवा 10 मेंढया आणि एक नर मेंढा अनुदान स्वरूपात दिला जातो. उस्मानाबादी किंवा संगमनेरी शेळ्या असल्यास 8 हजार प्रती शेळी प्रमाणे 80 हजार रुपये अनुदान दिले जाते, तर बोकडासाठी 10 हजार रुपये मिळतात. स्थानिक पैदासी शेळ्यांसाठी 6 हजार रुपये प्रती शेळी प्रमाणे 60 हजार रुपये अनुदान मिळते.

कुक्कुटपालन शेड आणि साहित्य खरेदीसाठी अनुदान

कुक्कुटपालन शेडसाठी 2 लाख रुपये आणि कुक्कुटपक्षांसाठी लागणारे साहित्य खरेदीसाठी 25 हजार रुपये असे एकूण 2 लाख 25 हजार रुपये अनुदान दिले जाते. खुल्या प्रवर्गासाठी 50 टक्के अनुदान तर अनुसूचित जाती-जमाती प्रवर्गासाठी 75 टक्के अनुदान दिले जाते.

ऑनलाईन अर्ज प्रक्रिया आणि आवश्यक कागदपत्रे

या योजनेसाठी अर्जदाराने AH – MAHABMS या वेबसाईटवर किंवा मोबाईल ॲपद्वारे ऑनलाइन अर्ज सादर करावा. अर्ज करताना आवश्यक कागदपत्रांमध्ये फोटो, सातबारा, 8 अ, अपत्य दाखला, आधार कार्ड आणि जात प्रमाणपत्र यांचा समावेश आहे.

जर तुम्ही या शेळी गट वाटप 2025 योजनेसाठी पात्र असाल तर शेवटच्या तारखेच्या आत अर्ज सादर करून द्या आणि या शासकीय योजनेचा लाभ मिळवा.

Leave a Comment