कुक्कुटपालन व्यवसाय सुरू करा महाराष्ट्र सरकारकडून मिळणार मोफत कोंबड्या ! Kukur Palan Scheme

Kukur Palan Scheme : राज्य सरकारने ग्रामीण भागातील बेरोजगार, शेतकरी आणि महिला बचत गटांसाठी सुवर्णसंधी उपलब्ध करून दिली आहे. 2 मे 2025 पासून सुरू झालेली कुक्कुटपालन योजना 2025 ही एक अनुदानाधारित योजना असून, त्याद्वारे मोफत कोंबड्या देण्यात येत आहेत. इच्छुक लाभार्थी 1 जून 2025 पर्यंत अर्ज करू शकतात

योजनेत काय मिळणार?

या योजनेत तलंगा जातीच्या २५ माद्या आणि ३ नर कोंबड्या दिल्या जातील. एकूण खर्च ₹5,420 असून, त्यातलं 50% म्हणजे ₹2,710 अनुदान राज्य सरकार देणार आहे. उर्वरित रक्कम लाभार्थ्यांनी भरायची आहे.

ही योजना शेतकरी, महिला बचत गटातील सदस्य, बेरोजगार युवक-युवती, आणि अल्पभूधारकांसाठी आहे. यामध्ये 30% आरक्षण महिलांसाठी ठेवलेलं आहे, जे ग्रामीण महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवण्याचं मोठं पाऊल आहे.

📋 अर्जासाठी लागणारी कागदपत्रे:

  • आधार कार्ड
  • सातबारा / ८अ उतारा
  • रहिवासी प्रमाणपत्र
  • बँक खाते तपशील
  • रेशन कार्ड
  • अपत्य प्रमाणपत्र (हवल्यास)
  • जात प्रमाणपत्र (लागू असल्यास)
  • शिक्षणाचा दाखला

हे पण वाचा :- पुढचे 5 दिवस या जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडणार तुमच्या जिल्ह्यात..?

अर्ज कसा कराल?

अर्ज ऑनलाईन खालील दोन माध्यमांतून करता येईल:

  • https://ah.mahabms.com
  • AH-MAHABMS मोबाईल अ‍ॅप (गुगल प्ले स्टोअरवर उपलब्ध)

अर्ज करताना सर्व माहिती अचूक भरा, कारण चुकीची माहिती दिल्यास अर्ज फेटाळला जाऊ शकतो.

  • पंचायत समिती किंवा जिल्हा पशुसंवर्धन कार्यालय
  • टोल फ्री नंबर: 1962
  • तांत्रिक मदतीसाठी: 8308584478

फायदे काय ?

  • स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याची संधी
  • अंडी व कोंबडी विक्रीतून नियमित उत्पन्न
  • शेतीव्यतिरिक्त पर्यायी रोजगार
  • ग्रामीण महिलांचा सशक्तीकरण

Leave a Comment