Rain news today राज्यभरातील नागरिकांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. सध्या उन्हाळ्याचा कडाका वाढलेला असतानाच अनेक भागांत अवकाळी पावसाला सुरुवात झालेली आहे. यंदा मान्सून वेळेआधी येण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली असून पावसाचा काळही समाधानकारक असण्याची शक्यता आहे. आज आपण पाहणार आहोत की पुढील काही दिवसांत कोणत्या जिल्ह्यांमध्ये पाऊस पडणार आहे, हवामान खात्याचा अंदाज काय आहे, याची सविस्तर माहिती.
चक्रीवादळाचा प्रभाव मुसळधार पावसाचा इशारा
हवामान विभागाच्या अंदाजानुसार कर्नाटक किनारपट्टीपासून पूर्व मध्य अरबी समुद्रात २१ मे रोजी चक्रीवादळ तयार होण्याची शक्यता आहे. या चक्रीवादळामुळे २२ मेच्या आसपास कमी दाबाचे क्षेत्र तयार होईल आणि त्याचा प्रभाव महाराष्ट्रावर दिसून येईल.
हे पण वाचा :- Airtel ने लाँच केला सर्वात स्वस्त रिचार्ज प्लॅन त्वरित रिचार्ज करा
मुंबई प्रादेशिक हवामान केंद्राच्या प्रमुख शुभांगी भुते यांनी दिलेल्या माहितीनुसार, २१ ते २५ मेदरम्यान मुंबई, दक्षिण कोकण आणि मध्य महाराष्ट्रात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. विशेषतः कोकण आणि त्यालगतच्या घाट भागांमध्ये अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.
Rain news today मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात वीजांसह पाऊस
२० ते २३ मेदरम्यान मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात विजांच्या कडकडाटासह हलक्यापासून मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. त्यामुळे नागरिकांनी आवश्यक ती काळजी घ्यावी, असा सल्ला देण्यात आला आहे.
मॉन्सूनच्या आगमनासाठी वातावरण अनुकूल
केरळमध्ये येत्या ४-५ दिवसांत मॉन्सून सुरु होण्यासाठी वातावरण पोषक होत आहे. दक्षिण अरबी समुद्र, मालदीवचा उर्वरित भाग आणि कोमोरिन परिसरात मॉन्सून पुढे सरकण्यास अनुकूल स्थिती निर्माण होत आहे.
हे पण वाचा :- खुशखबर! गॅस सिलेंडर एवढ्या रुपयांनी झाला स्वस्त! नवीन रेट इथ पहा
वादळी वाऱ्याचा इशारा मच्छीमारांना सतर्क राहण्याचे आवाहन
उत्तर कोकण किनाऱ्यावर २१ ते २४ मे दरम्यान वादळी वाऱ्यांचा इशारा देण्यात आला असून ३५ ते ५५ किमी प्रतितास वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. याशिवाय २४ मे रोजी दक्षिण कोकण, गोवा किनारा आणि जवळच्या भागांमध्येही वादळी वारे वाहणार असल्याने मच्छीमारांनी या कालावधीत समुद्रात न जाण्याचा सल्ला दिला आहे.