भारतीय रेल्वेत 14,298 पदांवर 10वी 12वी पासवर मेगाभरती पगार 92 हजारांपर्यंत भरा ऑनलाईन फॉर्म ! RRB Technician Bharti 2024

RRB Technician Bharti 2024 नमस्कार विद्यार्थी मित्रांनो,नोकरीच्या शोधात असलेल्या विद्यार्थ्यांसाठी आम्ही नेहमीच विविध संधी उपलब्ध करून देत असतो, ज्यामुळे अनेक विद्यार्थ्यांना उपयुक्त संधी मिळाल्या आहेत. आज आम्ही तुमच्यासाठी एक अनोखी संधी घेऊन आलो आहोत.

आजकाल अनेक तरुणांनी आपले शिक्षण पूर्ण केले आहे, मात्र तरीही त्यांना नोकरी मिळवण्यात अडचणी येत आहेत. अशा परिस्थितीत आम्ही तुमच्यासाठी भारतीय रेल्वेमध्ये नोकरीच्या संधीची माहिती घेऊन आलो आहोत.

भारतीय रेल्वेमध्ये एक मोठी भरती प्रक्रिया सुरू आहे. ही भरती विशेषता रेल्वे तंत्रज्ञ या पदांसाठी आहे व या अंतर्गत तब्बल 14,298 पदांवर नियुक्ती केली जाणार आहे. चला तर मग मित्रांनो पाहूया याबद्दल सविस्तर माहिती.

निवड प्रक्रिया : मित्रांनो,या भरतीसाठी उमेदवारांना अनेक टप्प्यांमधून जावे लागेल. पहिल्या टप्प्यात उमेदवारांना संगणक आधारित परीक्षा (CBT) द्यावी लागेल. या परीक्षेची तारीख अजून निश्चित झालेली नाही, पण मिळालेल्या माहिती नुसार ऑक्टोबर किंवा नोव्हेंबर महिन्यात परीक्षा होण्याची शक्यता आहे. या परीक्षेनंतर उमेदवारांच्या सर्व कागदपत्रांची पडताळणी केली जाईल व त्यानंतर मेडिकल चाचणी पार पडेल. हे सर्व झाल्यानंतर पात्र असलेल्या उमेदवारांना पुढील टप्प्यात सहभागी होता येतो.

ही भरती वाचा :- 7वी ते पदवीधरांना या महानगरपालिकेत नवीन पदांवर भरती भरा ऑनलाईन फॉर्म ! ही शेवटची तारीख !

अर्ज प्रक्रिया : देखील सोपी करण्यात आलेली आहे. इच्छुक उमेदवारांनी अधिकृत वेबसाईटवर जाऊन अर्ज करावा लागेल. परंतु या अर्जाची लिंक फक्त 15 दिवसांसाठी सक्रिय असणार आहे, त्यामुळे उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज करणे अत्यंत आवश्यक आहे.

अर्ज शुल्क : या पदासाठी अर्ज करण्यासाठी सामान्य उमेदवारांना 500 रुपये शुल्क भरावे लागेल. मात्र, सीबीटी परीक्षा दिल्यानंतर हे 500 रुपये परत केले जातील. तसेच, आरक्षित श्रेणीतील उमेदवारांना 250 रुपये शुल्क भरावे लागेल, आणि त्यांनाही परीक्षा दिल्यानंतर संपूर्ण शुल्क परत मिळेल.

वेतनश्रेणी – RRB Technician या भरती अंतर्गत निवडलेल्या उमेदवारांना लेवल 5 नुसार वेतन मिळणार आहे. वेतनश्रेणी 29,000 रुपये ते 92,300 रुपये इतकी असणार आहे.

अधिक माहितीसाठीयेथे क्लिक करा
व्हाट्सअप ग्रुप जॉईनयेथे क्लिक करा
मूळ जाहिरातयेथे क्लिक करा
ऑनलाईन अर्ज वेबसाईटयेथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा

Leave a Comment