Mahanirmiti Bharti 2024 महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनी (Mahanirmiti) ने 2024 साठी एक मोठी पदभरती जाहिर केली आहे. ही भरती तंत्रज्ञ-3 या पदासाठी असून, एकूण 800 रिक्त जागांसाठी अर्ज मागवले आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज करणे आवश्यक आहे. अर्ज करण्याची अंतिम तारीख 10 जानेवारी 2025 आहे.
Mahanirmiti Bharti 2024 रिक्त पदे आणि शैक्षणिक पात्रता
- रिक्त पदांचे नाव : तंत्रज्ञ-3
- एकूण रिक्त जागा : 800 जागा
शैक्षणिक पात्रता: उमेदवारांना ITI NCTVT किंवा MSCVT मध्ये किमान एक संबंधित व्यापार (उदा. इलेक्ट्रिशियन, वायरमन, वेल्डर, फिटर, इत्यादी) मध्ये शिक्षण असणे आवश्यक आहे. अधिक माहिती खालील तक्त्यात दिलेली आहे:
- इलेक्ट्रिशियन (वीजतंत्री)
- वायरमन (तारतंत्री)
- मशिनिस्ट (यंत्र कारागीर)
- फिटर (जोडारी)
- वेल्डर (संधाता)
- इन्स्ट्रयुमेंट मेकॅनिक
- ऑपरेटर कम मेकॅनिक
- इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी & इलेक्ट्रॉनिक्स सिस्टीम मेंटेनन्स इत्यादी
Mahanirmiti Bharti 2024 वयोमर्यादा
अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय 01 ऑक्टोबर 2024 रोजी 18 ते 38 वर्षे दरम्यान असावे. मागासवर्गीय उमेदवारांसाठी 5 वर्षांची सूट देण्यात आली आहे.
परीक्षा फी
- खुला प्रवर्ग: ₹500/-
- मागासवर्गीय प्रवर्ग: ₹300/-
पगार : तंत्रज्ञ-3 पदावर निवड झालेल्या उमेदवारांना ₹34,555/- ते ₹86,865/- दरमहा पगार दिला जाईल.
नोकरी ठिकाण : ही भरती महाराष्ट्र राज्यभर विविध ठिकाणी होईल.
अर्ज पद्धत आणि शेवटची तारीख
उमेदवारांना ऑनलाइन अर्ज करणे आवश्यक आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 जानेवारी 2025 आहे.
अधिक माहिती
भरतीसंबंधी अधिक तपशील, अर्ज प्रक्रिया आणि इतर महत्त्वाची माहिती जाणून घेण्यासाठी खालील अधिकृत लिंकवर जा:
- अधिकृत संकेतस्थळ: https://mahagenco.in/
- भरतीची जाहिरात पाहण्यासाठी: येथे क्लिक करा
- ऑनलाइन अर्ज करण्यासाठी: येथे क्लिक करा