मित्रांनो नमस्कार, Grampanchayat Bharti 2024 या अंतर्गत सफाई कर्मचारी आणि इतर पदासाठी 7वी 10वी व 12वी पास असलेल्या उमेदवाराकडून अर्ज मागविण्यात आलेले आहेत, मित्रांनो तुम्हाला ग्रामपंचायत अंतर्गत या पदासाठी अर्ज करायचे असतील तर भरतीची संपूर्ण माहिती जाणून घ्या.
या ग्रामपंचायत मध्ये सफाई कर्मचाऱ्यांच्या रिक्त पदासाठी नव्याने पद भरती करण्यासाठी इच्छुक उमेदवार खालील संपूर्ण माहिती वाचून झाल्यानंतर अर्ज सादर करू शकतात.
या भरतीची जाहिरात ग्रामसेवक ग्रुप ग्रामपंचायत द्वारे प्रकाशित करण्यात आलेली आहे, याची सविस्तर खाली माहिती दिलेली आहे.
सफाई कर्मचारी भरती 2024
भरती विभाग | ग्रामसेवक ग्रुप व ग्रामपंचायत |
पदाचे नाव | सफाई कर्मचारी |
शैक्षणिक पात्रता | सातवी, दहावी, व बारावी |
अर्ज पद्धत | ऑफलाइन |
पगार | महिला 8 हजार 500 रु, पुरुष 10 हजार रुपये |
वयोमर्यादा | खुला प्रवर्ग 38, मागासवर्गीय 43 |
नोकरी ठिकाण | सावरोळी, ता. खालापूर, रायगड |
हे पण वाचा :- डाटा एंट्री ऑपरेटर या पदांवर 12वी पासवर मोठी भरती पगार 20 हजार इथं भरून द्या फॉर्म चान्स सोडू नकाच !
- भरती कालावधी : सफाई कर्मचारी या पदासाठी भरती होत असलेल्या उमेदवारांची निवड 11 महिन्यांकरिता तात्पुरत्या स्वरूपात असणार आहे.
- सफाई कर्मचारी पदसंख्या : एकूण 05 रिक्त जागांसाठी सफाई कर्मचारी या पदाची भरती होत आहे.
- नोकरी ठिकाण : सफाई कर्मचारी या पदासाठी नोकरी ठिकाण सावरोळी, तालुका खालापूर, जिल्हा रायगड या अंतर्गत भरती होत आहे.
सफाई कर्मचारी भरतीचे सर्व अधिकार ग्रुप ग्रामपंचायत सावरोळी यांनी राखून ठेवलेले आहेत. अधिक माहितीसाठी ग्रामपंचायतीकडे संपर्क करावा, उमेदवारांची तोंडी मुलाखत घेण्यात येणार आहे, अन् नियुक्तीपत्र देण्यात येणार आहेत.
ग्रामपंचायत सावरोळी हद्दीतील उमेदवारास प्राधान्य, तसेच सफाई संबंधी कामाचा अनुभव असणाऱ्यांना देखील प्राधान्य मिळणार आता या भरतीसाठी ची पदाचे नाव आणि पदसंख्या शैक्षणिक पात्रता नोकरी ठिकाण आणि इतर माहिती वर जाणून घेतलेली आहे. या भरतीचा अर्ज करण्याची शेवटची दिनांक काय असेल ?
मूळ पीडीएफ जाहिरात | येथे क्लीक करून पहा |
अधिकृत वेबसाईट | येथे क्लीक करा |
अर्ज करण्याची शेवटची दिनांक : 25 जुलै 2024 असणार आहे
अर्ज पाठवण्याचा पत्ता : सफाई कर्मचारी ग्रामपंचायत भरती ग्रुप ग्रामपंचायत सावरोळी तालुका खालापूर, जिल्हा रायगड या ठिकाणी अर्ज तुम्हाला पाठवायचा. अधिक माहितीसाठी कृपया उमेदवारांनी जाहिरात वाचावी.