Vastu Seva Kar Vibhag Bharti 2024 : मित्रांनो नमस्कार, महाराष्ट्र शासनाच्या वस्तू व सेवा कर या विभागामध्ये संगणक ऑपरेटर या पदासाठीची भरती निघालेली आहे. भरतीमध्ये बारावी उत्तीर्ण उमेदवार अर्ज करू शकणार आहे, या भरतीमध्ये ऑनलाईन अर्ज करण्याची पद्धत आहे, अर्ज करण्यासाठीचे भरतीचे संपूर्ण माहिती पदाचे नाव,
पदसंख्या, शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, नोकरी ठिकाण अर्जाची शेवटची तारीख, आणि मूळ पीडीएफ जाहिरासह ऑनलाइन अर्ज वेबसाईट याबाबतची सविस्तर माहिती खाली देण्यात आली आहे. या भरतीची जाहिरात महाराष्ट्र शासन वस्तू व सेवा कर विभाग याद्वारे प्रकाशित करण्यात आले आहेत.
भरती विभाग : महाराष्ट्र शासन वस्तू व सेवा कर विभागीय याद्वारे विविध पदासाठीची भरती ही महाराष्ट्र शासनाच्या या विभागाद्वारे करण्यात येत आहे.
पदाचे नाव : वरील विभागामध्ये होत असलेल्या भरतीमध्ये संगणक चालक (कॉम्पुटर ऑपरेटर) या पदासाठी ची भरती आहे.
शैक्षणिक पात्रता : बारावी उत्तीर्ण असलेले उमेदवार यासाठी अर्ज करू शकतात उमेदवाराला मराठी इंग्रजी भाषेचे ज्ञान असणे आवश्यक आहे.
पदसंख्या : वरील संगणक ऑपरेटर या पदासाठी पदसंख्या यामध्ये एकूण 10 रिक्त पदे भरण्यात येत आहेत.
वयोमर्यादा : कॅम्पुटर ऑपरेटर या पदासाठी अर्ज करण्याची वयोमर्यादा 18 ते 35 वर्षे आहे.
अर्ज करण्याची पद्धत : वरील संगणक चालक या पदासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज ई-मेल द्वारे मागविण्यात आलेली आहे.
पगार दरमहा : वरील पदासाठी निवड झालेल्या उमेदवारांना प्रति महिना 6 हजार रुपये दरमहा पगार मिळणार आहे.
भरती कालावधी : वरील पदासाठी अर्ज करत असाल तर यामध्ये फक्त तात्पुरती पदाची ही नियुक्ती केली जाणार आहे, यामध्ये सहा महिने भरतीची कालावधी राहणार आहे.
नोकरी ठिकाण : वरील पदासाठी निवड झालेल्या उमेदवारांना नोकरी ठिकाण म्हणून नागपूर महाराष्ट्र या ठिकाणी करावा लागेल.
अर्ज कालावधी : वरील पदासाठी अर्ज करत असाल तर उमेदवारांनी 10/09/2024 पर्यंत ऑनलाईन अर्ज सादर करायचे आहे.
ही भरती वाचा :- शासनाच्या या विभागात सरकारी नोकरीचा चान्स फक्त 10वी पासवर पगार 41 हजारांपर्यंत !
संपर्क : वरील पदासाठी अर्ज करत असाल तर अप्पर राज्यकर आयुक्त नागपूर क्षेत्र नागपूर यांचे कार्यालय वस्तू व सेवा कर भवन सिव्हिल लाईन नागपूर – 440001 तसेच कार्यालयीन दूरध्वनी क्रमांक : 07122564511 तसेच भ्रमणध्वनी क्रमांक 7972164232 यासाठी संपर्क तुम्हाला करता येणार आहे.
अर्जची शेवटची तारीख : वरील पदासाठी कॉम्प्युटर ऑपरेटर याकरिता अर्ज करत असाल तर 10 सप्टेंबर 2024 पर्यंत ऑनलाईन व्यवसाय करता येणार आहे.
अर्ज पद्दत : वरील पदासाठी निवड झालेल्या उमेदवारांना ईमेलद्वारे म्हणजेच अर्ज करावा लागणार आहे.
ई-मेल पत्ता : additionalcommissionernagpur01@gmail.co
मित्रांनो ही होती महाराष्ट्र शासनाच्या वस्तू व सेवा कर या विभागात संगणक ऑपरेटर या पदासाठीची भरती यासाठी पात्रता बारावी उत्तीर्ण आहे. ऑनलाइन ईमेल द्वारे या ठिकाणी अर्ज करता येणार आहे. अर्ज करण्यासाठीची पीडीएफ जाहिरात ऑनलाइन ईमेल ऍड्रेस आणि त्याचबरोबर अधिकृत वेबसाईट याची संपूर्ण माहिती खाली दिलेली आहे.
मूळ पीडीएफ जाहिरात | येथे क्लीक करा |
ई-मेल आयडी | येथे क्लीक करा |
अधिकृत वेबसाईट | येथे क्लीक करा |