ST Mahamandal News एसटी प्रवाशांसाठी पुन्हा ही आनंदाची बातमी सरकारचा मोठा निर्णय

ST Mahamandal News राज्यातील एसटी प्रवाशांसाठी एक मोठी आनंदाची बातमी समोर आली आहे. सरकारने एसटी प्रवाशांच्या फायद्यासाठी एक मोठा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे एसटी प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे. आपल्या लाल परीच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात प्रवास करणाऱ्या नागरिकांसाठी हा निर्णय महत्त्वाचा ठरणार आहे.

एसटी महामंडळाच्या सुरक्षित आणि वेळेवर प्रवासाच्या सेवेला आणखी मजबुती देण्यासाठी सरकारकडून वेळोवेळी नवीन धोरणे राबवली जातात आणि विविध योजना लागू केल्या जातात.

ST Mahamandal News ताफ्यात लवकरच स्मार्ट बसेस

राज्य परिवहन महामंडळाच्या सेवेला आणखी अद्ययावत आणि सुरक्षित बनवण्यासाठी आता स्मार्ट बसेस ताफ्यात समाविष्ट केल्या जाणार आहेत. या अत्याधुनिक बसमध्ये फोम-आधारित अग्निशमन यंत्रणा, सीसीटीव्ही, जीपीएस, एआय आधारित कॅमेरे, एल.ई.डी. टीव्ही, वाय-फाय, चोरी-प्रतिबंधक तंत्रज्ञान आणि आधुनिक बस लॉक सिस्टीम असणार आहे. या स्मार्ट बसेसच्या माध्यमातून प्रवाशांना सुरक्षित आणि आरामदायक प्रवास अनुभवता येणार आहे.

📢 हे पण वाचा :- 10वी 12वीचे गुणपत्रक आता विद्यार्थ्यांना या तारखेला मिळणार…

यासंदर्भात परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी माहिती दिली आहे की, चालकाच्या बस चालविण्याच्या पद्धतीवर देखरेख ठेवणारे कॅमेरे बसमध्ये बसविण्यात येणार आहेत. तसेच, बसस्थानकांवर पार्किंगमध्ये असलेल्या बसेस पूर्णपणे बंद राहतील, अशा प्रकारची यंत्रणा देखील स्थापित करण्यात येणार आहे.

एसटी महामंडळाच्या या नवीन उपक्रमामुळे प्रवाशांना सुरक्षितता, वेळेवर सेवा आणि अत्याधुनिक सोयीसुविधांचा लाभ मिळेल. त्यामुळे एसटी प्रवाशांसाठी ही एक मोठी आनंदाची बातमी ठरली आहे.

Leave a Comment