तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाची स्कॉलरशिप घेऊन आलेलो आहे. Sarthi Scholarship Mahiti Marathi म्हणजेच छत्रपती राजाराम महाराज सारथी शिष्यवृत्ती योजना महाराष्ट्र 2024 या अंतर्गत तुम्ही शिष्यवृत्ती मिळू शकतात.
आता ही कोणत्या विद्यार्थ्यांसाठी स्कॉलरशिप ? यासाठी कोणते विद्यार्थी पात्र ? यासाठी कागदपत्रे आणि अर्ज पद्धत, कागदपत्रे इतर सविस्तर माहिती खाली देण्यात आलेली आहे. महाराष्ट्र शासनाकडून विद्यार्थ्यांसाठी अनेक योजना स्कॉलरशिपच्या माध्यमातून राबविल्या जातात.
परंतु आज आपण सारथी म्हणजेच छत्रपती राजाराम महाराज सारथी स्कॉलरशिप योजनेअंतर्गत इयत्ता नववी आणि दहावी, अकरावीच्या मराठा कुणबी, कुणबी-मराठा, आणि मराठा कुणबी या गटातील विद्यार्थ्यांसाठी ही छत्रपती राजाराम महाराज सारथी स्कॉलरशिप योजना सुरू करण्यात आली आहे.
Sarthi Scholarship Mahiti Marathi
या ठिकाणी संपूर्ण माहिती जाणून घेऊया. आता या विद्यार्थ्यांना प्रत्येक शैक्षणिक वर्षांमध्ये दर महिन्याला 800 रुपये प्रमाणे वार्षिक असे 9,600 रुपये शिष्यवृत्ती या ठिकाणी मिळणार आहे.
या संदर्भातील सविस्तर माहिती पाहूयात. तुम्ही या स्कॉलरशिपचा लाभ घेऊ इच्छित असाल तर या ठिकाणी पात्रता नववी, दहावी, आणि अकरावी स्वतंत्रपणे अर्जाचा नमुना, मुख्याध्यापकाची शिफारस पत्र व अर्ज भरताना विचारात घ्यायचे सूचना सोबत जोडण्याची कागदपत्रे इतर माहिती भरणे आवश्यक आहे.
छत्रपती राजाराम महाराज सारथी स्कॉलरशिप योजनेचा उद्देश ?
वरील 4 गटातील समाजाच्या आर्थिक दुर्बल घटकातील प्रज्ञावन विद्यार्थ्यांच्या शोध घेऊन त्या ठिकाणी त्यांना सर्वोत्तम शिक्षण मिळण्याच्या दृष्टीने या ठिकाणी ही योजना म्हणजेच स्कॉलरशिप या ठिकाणी सुरू आहेत. विद्यार्थ्यांसाठीची पात्रता काय आहे हे देखील जाणून घेणे गरजेचे आहे पात्रता खाली दिली आहेत.
हे पण वाचा :- भारतीय हवाई दल अग्निविर भरती तयारी कशी करावी संपूर्ण माहिती मराठीत !
छत्रपती राजाराम महाराज सारथी स्कॉलरशिप विद्यार्थी पात्रता
- योजनेचा लाभ घेण्यासाठी विद्यार्थी 9वी, 10वी आणि अकरावी वर्गात शिकणारा असावा.
- विद्यार्थी मराठा, कुणबी, कुणबी-मराठा किंवा मराठा-कुणबी या लक्षणीय गटातील असणं आवश्यक.
- राज्यातील कोणत्याही शासकीय, शासन मान्य, अनुदानित किंवा स्थानिक स्वराज्य संस्थेत, शाळेत प्रवेश असावा
- NMMS ही परीक्षा उत्तीर्ण झालेल्या केंद्र शासनाची शिष्यवृत्ती व अप्राप्त असलेल्या नववीमध्ये लक्ष गटातील विद्यार्थी पात्र.
- छत्रपती राजाराम महाराज सारथी स्कॉलरशिप योजनेसाठी पात्र ठरू शकतात.
- NMMS परीक्षा उत्तीर्ण होऊन केंद्र शासनाच्या मेरिट लिस्ट मध्ये शिष्यवृत्तीस पात्र झालेल्या विद्यार्थ्यास या सारखी स्कॉलरशिपचा लाभ मिळत नाही.
- विनाअनुदानित, स्वयं अर्थसहाय्यीत, ज्युनिअर कॉलेज, केंद्रीय विद्यालय, जवाहर नवोदय विद्यालय, सोबतच शासकीय वसीगृह किंवा सैनिकी शाळेतील विद्यार्थी यासाठी अपात्र असतील.
- नववीच्या वर्गात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचे आई-वडील वार्षिक उत्पन्न 3 लाख 50 हजार पेक्षा कमी असावे.
- दहावी आणि अकरावी मध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचे आई-वडिलांचे वार्षिक उत्पन्न 1 लाख 50 हजार पेक्षा कमी असावं
- दहावी मध्ये शिकत असलेल्या गटातील विद्यार्थी हे 9वी मध्ये किमान 55% गुणासह परीक्षा पास असावा.
- अकरावी मध्ये शिकत असलेल्या वरील लक्षणीय गटातील विद्यार्थी नववी मध्ये किमान 60% गुण असणे आवश्यक आहे.
या स्कॉलरशिपचा लाभ नवीन अर्ज नमुना आणि फॉर्म हे तुम्हाला नववी, दहावी, अकरावी आणि सूचना यामध्ये खाली देण्यात आलेले आहे, ते तुम्ही बघून घेऊ शकता.
छत्रपती राजाराम महाराज शिष्यवृत्ती योजना कागदपत्रे लिस्ट 2024-25
- विहित नमुन्यातील शिष्यवृत्ती मागणी अर्ज
- विहित नमुन्यातील मुख्याध्यापक/ प्राचार्यांचे शिफारस पत्र
- तहसीलदार यांचे उत्पन्नाचे प्रमाणपत्र
- विद्यार्थ्यांचे आधार कार्ड सत्यप्रत
- बँक खाते पासबुक पहिले पानाचे
- मागील वर्षाची गुणपत्रिका सत्यप्रत
- NMMS परीक्षा उत्तीर्ण गुणपत्रिका / निकाल
- अनावश्यक कागदपत्रे जोडू नयेत.
इतर माहितीची काळजी घ्यायची आहे. अशा पद्धतीने छत्रपती राजाराम महाराज सारथी स्कॉलरशिप महाराष्ट्र 2024-25 योजनेची माहिती जाणून घेतली आहे.
Official Website :- Click Here