Repo Rate Today आज आपण जाणून घेणार आहोत की घर आणि गाडी खरेदीसाठी सरकारने कोणता मोठा निर्णय घेतला आहे आणि आरबीआयच्या नव्या निर्णयाचा ग्राहकांना नेमका कसा फायदा होणार आहे. या संदर्भात संपूर्ण माहिती आपण पाहणार आहोत.
घर आणि गाडी खरेदीसाठी मोठी संधी
राज्यातील नागरिकांसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे. जर तुम्ही घर किंवा गाडी खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर तुमच्यासाठी एक महत्त्वाचा निर्णय झालेला आहे. गाडी किंवा घर खरेदी करताना आपण नेहमीच बँक किंवा फायनान्स कंपन्यांकडून कर्ज घेतो. या कर्जावर व्याजदर किती ठरावा, हे प्रामुख्याने रेपो रेट वर अवलंबून असते.
हे पण वाचा :- Pm किसान योजनेचा हप्ता या तारखेला येणार खात्यात पहा तारीख
रेपो रेट म्हणजे काय? बँका आरबीआयकडून जेव्हा पैसे उधार घेतात, तेव्हा त्या रकमेवर आरबीआय ज्या व्याजदराने पैसे घेते, त्याला रेपो रेट असे म्हणतात. हा दर कमी असेल, तर कर्जदारांना कमी व्याजदराने कर्ज उपलब्ध होते आणि हप्त्यांवरही कमी ताण येतो. परंतु, रेपो रेट वाढला, तर त्याचा थेट परिणाम ईएमआयवर होतो.
Repo Rate Today आरबीआयचा मोठा निर्णय
ऑक्टोबर २०१९ पासून आरबीआयच्या नियमानुसार, बँकांनी त्यांच्या किरकोळ कर्जांचे दर बाह्य बेंचमार्क म्हणजेच ई-बीएलआरशी (External Benchmark Lending Rate) जोडणे बंधनकारक केले. यामुळे रेपो रेट हा बेंचमार्क ठरला असून, रेपो दर कमी-जास्त झाल्यास कर्जाच्या व्याजदरावर थेट परिणाम होतो.
भारतीय रिझर्व्ह बँकेने सात फेब्रुवारी २०२५ रोजी रेपो दरात पाव टक्क्याने कपात केली आणि त्यानंतर नऊ एप्रिल २०२५ रोजी पुन्हा पाव टक्क्याने कपात केली. याचा फायदा रेपो-लिंक्ड लेंडिंग रेट (RLLR) वर आधारित कर्जदारांना होणार आहे. ज्यांचे कर्ज RLLR शी निगडीत आहे, त्यांनी त्वरित आपली माहिती तपासावी आणि कर्ज देणाऱ्या बँकेला व्याजदर कपातबाबत लेखी कळवावे. यामुळे आपल्या ईएमआयमध्ये घट होऊन व्याज-खर्चात बचत होईल.