Pik Vima Yojans आज आपण शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची आणि दिलासादायक माहिती पाहणार आहोत. ती म्हणजे पिक विमा योजना कोणाला लागू होणार आहे, कोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना याचा लाभ मिळणार आहे आणि या योजनेंतर्गत पैसे कधी मिळणार याची संपूर्ण माहिती आपण समजून घेणार आहोत.
पिक विमा योजनेची माहिती – काय आहे ही योजना?
पिक विमा योजना ही शेतकऱ्यांसाठी केंद्र व राज्य सरकारच्या सहकार्याने राबवली जाणारी महत्त्वाची योजना आहे. नैसर्गिक आपत्तीमुळे, पावसाअभावी किंवा इतर कारणांमुळे जर शेतकऱ्यांचे पीक नुकसान झाले, तर त्यांना सरकारकडून आर्थिक भरपाई दिली जाते. हे पैसे थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात DBT (Direct Benefit Transfer) द्वारे जमा केले जातात.
हे पण वाचा :- खुशखबर! गॅस सिलेंडर एवढ्या रुपयांनी झाला स्वस्त! नवीन रेट इथ पहा
सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय – कोणत्या जिल्ह्यांना मिळणार लाभ?
महाराष्ट्र सरकारने यंदा ३४ जिल्ह्यांतील शेतकऱ्यांना पिक विमा देण्याचा निर्णय घेतला आहे. या योजनेसाठी ९ विमा कंपन्या नेमण्यात आल्या असून त्या शेतकऱ्यांच्या खात्यात थेट पैसे जमा करतील.
सुरुवातीला परभणी, नांदेड, हिंगोली, धाराशिव आणि सांगली या ५ जिल्ह्यांतील शेतकऱ्यांना २५% आगाऊ रक्कम मिळणार आहे. उर्वरित रक्कम नंतरच्या टप्प्यात दिली जाईल.
Pik Vima Yojans अंतर्गत किती रक्कम मिळू शकते?
शेतकऱ्यांना त्यांच्या नुकसानीच्या प्रमाणानुसार आणि पीक प्रकारानुसार प्रति हेक्टर ₹१२,५०० ते ₹४०,००० पर्यंतची मदत मिळू शकते.
पिक विमा कोणत्या पिकांसाठी लागू आहे?
ही योजना सध्या खालील पिकांसाठी लागू आहे:
- सोयाबीन
- उसभात (तांदूळ)
- मका
- आणि इतर ५५ पेक्षा जास्त प्रकारची पिकं
पिक विमा मिळण्यासाठी आवश्यक गोष्टी:
पिक विमा योजनेचा लाभ घेण्यासाठी खालील बाबी पूर्ण असणे गरजेचे आहे:
- आधार कार्ड बँक खात्याशी जोडलेले असावे.
- KYC प्रक्रिया पूर्ण झालेली असावी.
- पिकाची पाहणी पूर्ण झालेली असावी.
- संबंधित कागदपत्रांची पूर्तता आणि अर्जाची पडताळणी झालेली असावी.
वरील सर्व अटी पूर्ण असल्यास, लवकरच शेतकऱ्यांच्या बँक खात्यात विमा रक्कम जमा होईल.
हे पण वाचा :- घरकुल योजनेत थेट 50,000 हजार रुपयांची वाढ सरकारचा नवीन जीआर असा घ्या लाभ
तुमचं नाव यादीत आहे का? हे कसं तपासायचं?
- तुमचं आधार कार्ड बँक खात्याशी लिंक आहे का ते तपासा.
- KYC झाली आहे का ते बघा.
- पिक विमा योजनेसाठी अर्ज केला आहे का ते खात्री करा.
- पिकाची पाहणी झाली आहे का ते तपासा.
जर ही सर्व प्रक्रिया पूर्ण झाली असेल, तर तुमचं नाव लाभार्थी यादीत असण्याची शक्यता आहे. जर आधार लिंक नसेल किंवा KYC प्रक्रिया पूर्ण नसेल, तर विमा रक्कम मिळण्यात अडथळे येऊ शकतात. म्हणून हे काम लवकरात लवकर पूर्ण करा.