मित्रांनो नमस्कार, तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाची Dr Panjabrao Deshmukh Shishyavrutti Yojana योजनेची माहिती जाणून घेणार आहोत. या अंतर्गत तुम्हाला 30,000 रुपये स्कॉलरशिप मिळणार आहे.
ही स्कॉलरशिप कोणती ? या योजनेचा लाभ कसा घ्यायचा आहे या योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्रता, कागदपत्रे, वैशिष्ट्ये, अर्ज प्रक्रिया, इतर सविस्तर माहिती आपण या लेखाच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
महाराष्ट्र शासनाकडून अनेक योजना या शिक्षण घेणाऱ्यांसाठी सुरू असतात. यामध्येच अतिशय महत्त्वाची योजना ही डॉ. पंजाबराव देशमुख वस्तीगृह निर्वाह भत्ता योजना 2024 महाराष्ट्र आहे.
या योजनेत तुम्हाला वार्षिक 30,000 रुपये या ठिकाणी मिळतात. आता या ठिकाणी योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्रता काय असेल हे आपण जाणून घेऊया.
राज्य शासनाने आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकाच्या शिक्षणा आरक्षणाची उत्पन्न मर्यादा वाढवून देतानाच आदिवासी, शेतमजूर, अल्पभूधारक शेतकरी, मागासवर्गीय, तसेच प्रवर्गाच्या समाजातील सर्वच घटकाला शिक्षणाच्या सवलती देण्यासाठी महत्त्वाचा निर्णय घेतला आहेत.
यामुळे आता शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना या ठिकाणी मोठा दिलासा मिळाला आहेत, आता शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रति महिना 2000 ते 3000 रुपये वस्तीगृह अनुदान देण्याचे निर्णय शासनाने घेतला आहे.
Dr Panjabrao Deshmukh Shishyavrutti Yojana Mahiti
या योजनेचं नाव डॉ. पंजाबराव देशमुख वसतिगृह निर्वाह भत्ता योजना असे या ठिकाणी सुरू करण्यात आलेली आहे. तर आता थोडक्यात माहिती आपण जाणून घेऊया तर काय ? वसतिगृह निर्वाह भत्ता योजना ज्या विद्यार्थ्यांचे पालक अल्पभूधारक शेतकरी, किंवा नोंदणीकृत मजूर आहेत अशा विद्यार्थ्यांना शासनाने निश्चित केलेल्या व्यवसायिक अभ्यासक्रमाचे शिक्षण घेण्यासाठी डॉ. पंजाबराव देशमुख वस्तीगृह निर्वाह भक्त योजना सुरू केली आहे.
यामध्ये शासकीय, अनुदानित व विनाअनुदानित अभियांत्रिकी महाविद्यालय अथवा तंत्रनिकेतन मध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना दरमहा निर्वाह भत्ता मिळतो. यामध्ये पाहायला गेलं तर कोणते विद्यार्थ्यांना तीस हजार रुपये हे वार्षिक मिळतात हे देखील महत्त्वाचं आहे.
- मुंबई महानगर क्षेत्र, पुणे, छत्रपती संभाजीनगर, नागपूर :- 3000 रुपये दरमहा म्हणजेच वार्षिक 30,000 रुपये
- वरील शहर सोडून इतर शहरांमध्ये जर शिक्षण घेत असाल :- प्रति महिना 2 हजार म्हणजे वार्षिक 20 हजार रुपये
स्कॉलरशिप प्रकार | वार्षिक उत्पन्न मर्यादा | वसतिगृह जिल्हा व ठिकाण | शिष्यवृत्ती रक्कम |
अल्पभूधारक शेतकरी व नोंदणीकृत मजूर | कोणतीही मर्यादा नाही | मुंबई, पुणे, छत्रपती संभाजीनगर, नागपूर आणि महानगर पालिका क्षेत्र मधील. | 30,000/- रुपये |
इतर शहरे आणि ग्रामीण भागासाठी | 20,000/- रुपये | ||
इतर विद्यार्थी | 1 लाख रुपये | मुंबई, पुणे, छत्रपती संभाजीनगर, नागपूर आणि महानगर पालिका क्षेत्र. | 10,000/- रुपये |
इतर शहरे आणि ग्रामीण भागासाठी | 8,000/- रुपये | ||
इतर विद्यार्थी | 1 लाख ते 8 लाख रुपये | मुंबई, पुणे, छत्रपती संभाजीनगर, नागपूर आणि महानगर पालिका क्षेत्र | 10,000/- रुपये |
इतर शहरे आणि ग्रामीण भागासाठी | 8,000/- रुपये | ||
बिगर व्यावसाईक अभ्यासक्रम विद्यार्थी | 1 लाख रुपये | – | 2,000 रुपये |
या योजनेची अंमलबजावणी शासनाकडून 2016-17 या शैक्षणिक वर्षापासून सुरू करण्यात आली, आता राजश्री छत्रपती शाहू महाराज शिक्षण शुल्क प्रतिपूर्ती योजना आणि डॉ. पंजाबराव देशमुख वस्तीगृह निर्वाह भत्ता योजना
या दोन्ही योजनेचा लाभ राज्यातील सात लाखाहून अधिक विद्यार्थ्यांना मिळाला असल्याचा अपडेट आहे. डॉ. पंजाबराव देशमुख वस्तीगृह निर्वाह भत्ता योजना काय आहे आणि त्यासाठी कोण पात्र आहे हे देखील माहिती जाणून घेऊया.
उच्च व तंत्र शिक्षण विभागाच्या अतिरिक्त्यातील सर्व विविध मान्यताप्राप्त व्यवसाय व बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी डॉ. पंजाबराव देशमुख वस्तीग्रह निर्वाह भत्ता योजना सुरू आहे.
हे पण वाचा :- ज्ञानज्योती सावित्रीबाई शिष्यवृत्ती योजना पात्रता कागदपत्रे संपूर्ण माहिती !
या योजनेत मुख्यता बारावी नंतरच्या अभ्यासक्रमासाठी राबविण्यात येते. योजनेचे लाभ हा लाभार्थी या विद्यार्थ्यांच्या आधार लिंक असलेल्या बँक खात्यामध्ये जमा केली जाते. या योजनेअंतर्गत विद्यार्थ्याला हायर एज्युकेशन शिक्षण घेताना महाविद्यालयात आलेल्या वस्तीगृहात ऍडमिशन मिळत नाही हे देखील या ठिकाणी लक्षात घ्यायचा आहे.
डॉ. पंजाबराव देशमुख वसतिगृह निर्वाह भत्ता योजना पात्रता
- अर्जदार महाराष्ट्र राज्यातील रहिवासी असावा
- अर्जदार हा संपूर्ण कुटुंबाचे असे एकूण उत्पन्न वर्षासाठी 2.5 लाख ते आठ लाख रुपयांच्या आत असणे आवश्यक
- प्रत्येक अर्जदाराला त्याचे उत्पन्न प्रमाणपत्र सादर करावे लागेल सदर अर्जदार योजनेसाठी अर्ज करायचा असेल तर त्याच्या पालकांनी मंजूर म्हणून नोंदणी करावी.
- ज्या कोणत्याही उमेदवारांचे पालकांकडे फारच कमी किंवा अजिबात शेती नाही अशा कुटुंबातील विद्यार्थी देखील अर्ज करू शकता. पण या परिस्थितीमध्ये अर्जदारास कामगार नोंदणी आणि जमीन नोंदणी प्रमाणपत्र म्हणजेच कामगार नोंदणी प्रमाणपत्र आणि जमीन नोंदणी प्रमाणपत्र हे घ्यावे लागेल आणि अर्ज सोबत जोडावे लागेल.
- पंजाबराव देशमुख वस्तीगृह या योजनेत अर्जदारांनी निवासी प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक बंधनकारक
- ज्या अर्जदारांनी 2010 नंतर सीएटी प्रवेश घेतला तीच या ठिकाणी अर्ज करू शकतात. याचा अर्थ फक्त तेच विद्यार्थी पात्र असतं जे केंद्रीय कृत प्रवेश प्रक्रियेतून प्रवेश केल्यानंतर जागा अलोटमेंट पत्र सादर करणे सक्षम असतील.
- डॉ. पंजाबराव देशमुख वसतिगृह योजनेत प्रत्येक घरातून फक्त दोन लाभार्थी वस्तीगृह अनुदान योजनेचा लाभ घेऊ शकतात.
- तेच विद्यार्थी योजनेस लाभ घेऊ शकता ज्यांनी व्यवसायिक अभ्यासक्रम किंवा तांत्रिक अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतला असेल.
- सेल फायनान्स सारखी कोणत्याही खाजगी संस्थेद्वारे ज्यांना संस्था स्तरावर प्रवेश मिळत होते या योजनेस अनुदानास मिळण्यास पात्र नसणार
- बँक खाते नंबर हा आधार नंबरशी लिंक असणे बंधनकारक
- शिष्यवृत्ती योजनेसारखेच आहे जर एखाद्या अनुदान मिळत असेल तर तो त्या वर्षी इतर कोणत्याही शिष्यवृत्ती योजनेसाठी अर्ज करू शकणार नाही. जर असे केल्यास त्याला शिष्यवृत्तीसाठी पहिली पसंती दुसरी पसंती निवडावी लागेल.
डॉ. पंजाबराव देशमुख वस्तीगृह निर्वाह भत्ता योजना अटी & शर्ती
- राजश्री शाहू महाराज शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती योजनेत पात्र विद्यार्थी ही अर्ज करण्यास पात्र असतील
- विद्यार्थ्यांनी शासकीय खाजगी अथवा निम-शासकीय वस्तीगृह मध्ये प्रवेश घेतल्या असल्यास त्या विद्यार्थ्यांनी त्याबाबत पुरावा अर्ज सोबत सादर करणे आवश्यक असेल
- खाजगी मालकीच्या घरामध्ये विद्यार्थ्यांना स्वतः राहण्याची सोय केली असल्यास अशा विद्यार्थ्यांना विकृत अथवा रोटर आईस भाडे कराराची प्रत अर्जासोबत सादर करणे आवश्यक असेल
- एखाद्या विद्यार्थ्यांना सामान्य रहिवासी असलेल्या त्याच गावातील किंवा शहरांमध्ये संस्थेमध्ये अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतल्या असल्यास निर्वाह भत्ता मिळणार नाही याची नोंद घ्यायची आहे.
- सोबतच एका कुटुंबातील दोन आपत्य पर्यंतचा मर्यादित असेल
- एखाद्या विद्यार्थ्याला विद्यार्थ्यास अन्य कोणत्याही योजनेखाली निर्वाहता मिळत असल्यास असा विद्यार्थी यावेळेस लाभ घेण्यास अपात्र ठरणार
- नोंदीचे विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतलेला अभ्यासक्रम कालावधी करतात निर्वाह भत्ता मिळतो
- विद्यार्थी नापास झाला किंवा अनुत्तीर्ण झाला किंवा काही कारणामुळे त्याला वर्षावर्गात प्रवेश मिळाला नाही, तर त्या वर्षापुर्ता निर्वाह भत्ता लाभ मिळणार नाही याची देखील नोंद घ्यायची आहे.
- योजनेअंतर्गत एक लाख रुपयापर्यंत उत्पन्न असलेल्या विद्यार्थ्यांना लाभ देणे करिता संख्याची कोणतीही मर्यादा नाही, मात्र एक लाख ते आठ लाख मरत असलेल्या अभ्यासक्रमाला प्रवेश देणाऱ्या विद्यार्थ्याला जिल्ह्यासाठी लाभार्थी विद्यार्थी कमीत कमी संख्या 500 ते निश्चित केलेली आहे.
डॉ. पंजाबराव देशमुख वस्तीगृह निर्वाह भत्ता योजना या योजनेचे सविस्तर अशी माहिती जाणून घेतलेली आहे. पात्रता, फायदे, आणि इतर माहिती जाणून घेतली आहे. या योजनेसाठी पात्र आवश्यक कागदपत्रे काय आहेत आणि अधिकृत वेबसाईट अर्ज कसा करायचा आहे याची माहिती खाली जाणून घेऊया.
डॉ. पंजाबराव देशमुख वसतिगृह निर्वाह भत्ता योजना कागदपत्रे लिस्ट
- विद्यार्थी अधिकृत अधिकाऱ्याने दिलेल्या अधिवास प्रमाणपत्र सादर करावे लागेल
- नोंदणीकृत कामगार प्रमाणपत्र
- अल्पभूधारक प्रमाणपत्र
- कौटुंबिक वार्षिक उत्पन्न प्रमाणपत्र
- वस्तीगृह दस्तऐवज विद्यार्थीनी अधिकृत अधिकाऱ्याने दिलेले मागील वार्षिक उत्पन्न प्रमाणपत्र
- सीएपी संबंधित दस्तऐवज (केवळ B.ed,Law, BPed,MPed लागेल
- संबंधित दस्तावेज अंतर असल्यास दोन मुलाचे कौटुंबिक घोषणा पत्र
- उपस्थिती प्रमाणपत्र
- मागील वर्षाची मार्कशीट
- विद्यार्थ्यांचे पॅन कार्ड
- वडिलांचे पॅन कार्ड
- आईचे पॅन कार्ड
असे इतर कागदपत्रे डॉक्टर पंजाबराव देशमुख निर्वाह भत्ता योजनेसाठी लागत असतात. अधिक माहिती करिता खाली देण्यात आलेली माहिती वाचावी.
How to Online Apply for Panjabrao Deshmukh Scholarship 2024 Maharashtra
निर्वाह भत्ता योजनेसाठी ऑनलाईन अर्ज सादर करू शकता.
- सर्वात अगोदर महाडीबीटी या अधिकृत संकेतस्थळावर जा
- पोर्टल वर गेल्यानंतर नवीन नोंदणी या पर्यावर क्लिक करून नवीन नोंदणी करून घ्या
- नोंदणी झाल्यानंतर युजर आयडी पासवर्ड टाकून लॉगिन करा
- डॅशबोर्ड आल्यानंतर आधार बँक लिस्ट चेक करा.
- आधार सोबत लिंग असलेली बँक येईल
- त्यानंतर तुमची वैयक्तिक माहिती भरून घ्यावी
- सर्व माहिती टाकल्यानंतर वस्तीगृहात राहत असेल तर त्याची पण माहिती भरा
- शिष्यवृत्ती संदर्भात संपूर्ण माहिती समोर येईल तो फॉर्म संपूर्ण तपासून घ्या
- त्यानंतर I Agree या बटनावर क्लिक करून सबमिट बटन वर क्लिक करा
- अशा पद्धतीने ऑनलाइन अर्ज सादर होईल.
वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQ)
पंजाबराव देशमुख वसतिगृहाची शिष्यवृत्ती किती आहे?
सदर योजना अंतर्गत विद्यार्थ्यांना दर वर्षी ₹30,000 पर्यंत स्कॉलरशिप मिळते.
डॉ. पंजाबराव देशमुख वसतिगृह निर्वाह भत्ता योजना कागदपत्रे लिस्ट
सदर योजनेचा लाभ घेण्यासाठी आवश्यक कागदपत्रे यांची लिस्ट वरील लेखात दिली आहेत ते पाहू शकता.
डॉ. पंजाबराव देशमुख वसतिगृह निर्वाह भत्ता योजना काय आहेत ?
या योजनेतून गरजू व गरीब विद्यार्थी यांना उच्च शिक्षण घेण्यासाठी स्कॉलरशिप देण्यात येत आहेत. ही रक्कम वार्षिक 30 हजार रुपये आहेत.