Dnyanjyoti Savitribai Phule Shishyavrutti Yojana | ज्ञानज्योती सावित्रीबाई शिष्यवृत्ती योजना पात्रता कागदपत्रे संपूर्ण माहिती !

मित्रांनो नमस्कार, तुमच्या कामाची माहिती घेऊन आलेलो आहे. आता या विद्यार्थ्यांना Dnyanjyoti Savitribai Phule Shishyavrutti Yojana अंतर्गत प्रत्येक वर्षी 60 हजार रुपये स्कॉलरशिप मिळणार आहे.

काय आहे ही ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना या योजनेत कोणत्या विद्यार्थ्यांना वार्षिक 60 हजार रुपये मिळणार आहे. यासाठी पात्रता, कागदपत्रे, अर्ज याची संपूर्ण माहिती

त्याचबरोबर शासनाने जो शासन निर्णय निर्गमित केलेला आहे याबाबतची सविस्तर माहिती शासनाच्या शासन निर्णयाद्वारे आपण आज जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजनेअंतर्गत ओबीसी प्रवर्गातील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी 60,000 स्कॉलरशिप देण्याचा शासनाने मोठा निर्णय घेतला आहे. यामुळे ओबीसी विद्यार्थ्यांना या ठिकाणी मोठा दिलासा मिळणार आहे.

योजनेचे नाव ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना [स्कॉलरशिप]
योजनेस पात्र गरीब OBC विध्यार्थी
योजनेची सुरुवातमहाराष्ट्र शासन [इतर मागास बहुजन विकास महामंडळ]
योजनेतून लाभ शिक्षणासाठी वार्षिक 60 हजार रुपये
किती वर्ष लाभ 5 किंवा 6 वर्ष
कोणत्या शिक्षणासाठी लाभ उच्च शिक्षणासाठी लाभ
किती हफ्त्यामध्ये मिळेल रक्कम एकूण 4 हफ्ते
शासन निर्णय ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना शासन निर्णय
अधिकृत वेबसाईटउपलब्ध नाही !

आता ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजनेतुन स्कॉलरशिप मिळणार आहे. योजनेअंतर्गत लाभ कसा घ्यायचा ? हे थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न येणार आहोत.

Dnyanjyoti Savitribai Phule Shishyavrutti Yojana संपूर्ण माहिती

वस्तीगृहात प्रवेश न मिळालेल्या विद्यार्थ्यांना वार्षिक खर्चासाठी अनुदान देण्याबाबत राबविण्यात येणाऱ्या अशा अनेक योजना आहे. त्यापैकी आदिवासी विकास विभागाच्या पंडित दीनदयाल उपाध्याय स्वयं व सामाजिक न्याय विभागाच्या

डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेच्या धर्तीवर आता इतर मागासवर्ग विमुक्त जाती, भटके जमाती, आणि विशेष मागास प्रवर्ग या प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी महाराष्ट्र शासनाकडून ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले योजना सुरू

करण्यास मंत्रिमंडळाने दिनांक 19/10/2023 मंत्रिमंडळामध्ये बैठकीस या निर्णय दिलेला आहे. या विभागात येणाऱ्या शिष्यवृत्ती अभिछात्रवृत्ती, वस्तीगृह, व वस्तीगृहात प्रवेश न मिळालेल्या विद्यार्थ्यांना देण्यात येणारा निर्वाह भत्ता

स्वयम असे विविध प्रकारच्या योजनांमध्ये तसेच यापुढे प्रस्तावित करण्यात येणारे योजनांमध्ये एक समान असावी यासाठी ही योजना सुरू केलेली आहे. आता यामध्ये पाहायला गेलं तर कोणत्या प्रवर्गातील विद्यार्थी येतात हे आपण थोडक्यात पाहूया.

भटक्या जमाती क, प्रवर्गातील धनगर समाजाची विद्यार्थी वगळून आणि विशेष मागास प्रवर्गातील उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी योजना लागू करण्यात आलेली आहे याची देखील तुम्हाला माहिती असणे गरजेचे आहे.

हे ही वाचा :- पंजाबराव देशमुख शिष्यवृत्ती योजना कागदपत्रे पात्रता 2024 संपूर्ण माहिती

Dnyanjyoti Savitribai Phule Shishyavrutti Yojana 2024

विशेष मागास प्रवर्गातील उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रति जिल्हा 600 याप्रमाणे एकूण 21 हजार 600 विद्यार्थ्यांकरीता ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना राबवण्यास मान्यता देण्यात आली आहे.

म्हणजेच आता विशेष मागास प्रवर्गातील उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रति जिल्हा म्हणजे एका जिल्ह्यातून सहाशे याप्रमाणे एकूण असे विद्यार्थ्यांसाठी ही ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना सुरू करण्यात आलेली आहे.

ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले स्कॉलरशिप योजना पात्रता ?

ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना वार्षिक 60 हजार रुपये स्कॉलरशिप घेण्यासाठी पात्रता ठरवून दिली आहे. यामध्ये पात्र असाल तर तुम्ही ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजनेचा लाभ घेऊन वार्षिक 60 हजार रुपये स्कॉलरशिप मिळू शकतात. यासाठी पात्रता काय ? खाली देण्यात आली आहे.

  • विद्यार्थी वस्तीगृह प्रवेशास पात्र असणे आवश्यक
  • सदर विद्यार्थी महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असणे आवश्यक
  • सक्षम प्राधिकार्‍याने दिलेला इतर मागास प्रवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती, व विशेष मागास प्रवर्गाचा जातीचा दाखला सादर करणे बंधनकारक
  • दिव्यांग प्रवर्गामधून अर्ज सादर करणाऱ्या विद्यार्थ्याला जिल्हा चिकित्सक यांचे 40% पेक्षा जास्त दिव्यांग असल्याबाबतचे प्रमाणपत्र अनिवार्य
  • अनाथ प्रवर्गातून अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यांना महिला व बालकल्याण विभागाचे सक्षम अधिकाऱ्याचे अनाथ प्रमाणपत्र अनिवार्य असेल
  • विद्यार्थ्यांचा स्वतःचा आधार क्रमांक व तो राष्ट्रीयकृत बँकेचे खात्याशी सलग्न करणे बंधनकारक
  • विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतलेले शैक्षणिक संस्था ज्या शहराच्या/ तालुक्याच्या ठिकाणी आहे त्या शहरातील सदर विद्यार्थी रहिवासी नसावा
  • विद्यार्थ्यांचे पालकाचे वार्षिक उत्पन्न 2.50 लाख रुपये पेक्षा जास्त नसाव
  • केंद्र शासनाकडून ज्या ज्या वेळी मॅट्रिक्ट शिष्यवृत्तीसाठी उत्पन्न मर्यादेत वाढ होईल त्यानुसार योजनेसाठी पालकाची वार्षिक उत्पन्न मर्यादा लागू राहील याची देखील नोंद घ्यायची आहे.

सावित्रीबाई फुले आधार शैक्षणिक निकष 2024 महाराष्ट्र

वरील माहिती मध्ये आपण ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजनेसंबंधीत पात्रता जाणून घेतली आहेत. आता जाणून घेऊया की सावित्रीबाई फुले आधार योजनेअंतर्गत शैक्षणिक निकष काय ? तर हे निकष खालील प्रमाणे असेल.

  • विद्यार्थी बारावी नंतरची उच्च शिक्षण घेत असावा
  • व्यावसायिक तसेच बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी विद्यार्थ्यांना गुणवत्तेनुसार त्याचबरोबर संबंधित प्रवर्गातून प्रवेश देण्यात येतो, सोबतच यासाठी बारावीच्या गुणांची टक्केवारी विचारात घेतली जाते.
  • व्यावसायिक तसेच बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमात प्रवेश मिळाल्या विद्यार्थ्यास सदर योजनेसाठी अर्ज करताना किमान 60% किंवा त्यापेक्षा त्या प्रमाणात ग्रेडेशन चे गुण असणं आवश्यक
  • सदर योजनेअंतर्गत प्रवेश संख्येच्या 70 टक्के जागा व्यवसाय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी व 30 टक्के जागा बिगर व्यावसायिक शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी असतात.
  • निवडलेले विद्यार्थी अभ्यासक्रम पूर्ण होईपर्यंत लाभास पात्र राहतात. तसेच अखिल भारतीय तंत्र शिक्षण परिषद, अखिल भारतीय वैद्यकीय परिषद, तसेच भारतीय फार्मसी परिषद, वास्तुकला परिषद, राज्य शासन किंवा त्यासोबत तत्सम संस्था तसेच मार्फत मान्यता प्राप्त महाविद्यालयात संस्थेमध्ये व मान्यता प्राप्त अभ्यासक्रमासाठी विद्यार्थ्यांना प्रवेश मिळालेला असणं आवश्यक आहे.
  • एका शाखेची पदवी किंवा पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी या योजनेचा लाभ घेतल्यानंतर पुन्हा इतर शाखेच्या पदवी किंवा पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी प्रवेश मिळणार नाही, After अनुज्ञेय राहणार नाही याची नोंद घ्यायची आहे.
  • आता योजनेचा लाभ घेण्याकरिता विद्यार्थ्यांचे महाविद्यालयाने उपस्थिती किमान 75 टक्के असावी.
  • तथापि एखाद्या विद्यार्थ्यांची उपस्थिती बाबत शंका निर्माण झाल्यास संबंधित महाविद्यालयामध्ये विद्यार्थ्यांच्या उपस्थिती बाबत शहानिशा करून विद्यार्थ्यांचे असलेली रक्कम आता करण्यासंबंधीत सहाय्यक संचालक म्हणजेच इतर मागास बहुजन कल्याण कार्यालय कडून योग्य तो निर्णय घेण्यात येऊ शकतो.
  • त्यासोबत निवड करण्यात आलेले विद्यार्थी संबंधित अभ्यासक्रम पूर्ण होईपर्यंत आवाज पात्र असतात. मात्र विद्यार्थ्यास त्या त्या अभ्यासक्रमाच्या परीक्षेत उत्तीर्ण होणे अनिवार्य असते याची देखील नोंद घ्यायची आहे.

आता आपण वरील 9 बाबींमध्ये जाणून घेतले आहे ते ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले या आधार योजनेत अंतर्गत वार्षिक 60 हजार रुपये स्कॉलरशिप शिष्यवृत्ती घ्यायची असेल तर तुम्हाला हे शैक्षणिक निकष आवश्यक आहेत.

ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आवश्यक इतर पात्रता निकष खालील प्रमाणे

योजनेचा लाभ घेण्यासाठी बारावीनंतरची उच्च शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना देण्यात येतो. एका विद्यार्थ्यास हा लाभ जास्तीत जास्त 05 वर्षे सदर योजनेचा लाभ घेता येतो. परंतु यामध्ये इंजीनियरिंग, वैद्यकीय, अभ्यासक्रमासाठी सदर योजनेचा लाभ सहा वर्ष मिळतो.

योजनेचा लाभ घेत असताना सदर विद्यार्थ्यांचे वय 30 वर्षापेक्षा अधिक नसावं. अभ्यासक्रमाच्या मध्यमध्ये कालावधीत प्रवेश घेतलेल्या विद्यार्थी हे ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजनेस लाभास पात्र असतील.

शिक्षणात खंड पडलेले विद्यार्थी आधार योजनेत लाभास पात्र असेल तथापि साधारण विद्यार्थी योजनेअंतर्गत निश्चित केलेल्या वयोमर्यापेक्षा अधिक वयाचा नसावा याची काळजी घ्यायची आहे.

पात्र विद्यार्थी अनुत्तीर्ण झाल्यास अनुत्तीर्ण कालावधीमध्ये योजनेअंतर्गत लाभ देण्यात येणार नाही. उत्तीर्ण झाल्यानंतर असा विद्यार्थी लाभास पुढे पात्र राहील याची काळजी घ्यायची आहे.

सन 2024-25 करीत प्रथम वर्षात प्रवेश घेतलेल्या 150 विद्यार्थ्यांना, द्वितीय वर्ष घेतलेल्या 150 विद्यार्थ्यांना तृतीय वर्षात प्रवेश घेतलेल्या 150 विद्यार्थ्यांना व चतुर्थक वर्षात प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना 150 विद्यार्थी अशा रीतीने प्रति जिल्हा सहाशे विद्यार्थ्यांना लाभ देण्यात येईल.

त्यानंतर म्हणजेच 2025-26 पासून व्यावसायिक तसेच बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या प्रथम वर्षात रिक्त असलेल्या जागांवर प्रवेश दिला जाईल याची देखील काळजी घ्यायची आहेत. (सर्व माहिती वाचत असताना मूळ शासन निर्णय देखील वाचून घ्यावा)

विद्यार्थी इतर मागास प्रवर्ग बहुजन कल्याण विभागाच्या, आदिवासी विकास विभागाच्या तसेच सामाजिक न्याय विभागाचे विभाग संबंधित शैक्षणिक संस्थेच्या वस्तीगृहामध्ये मोफत प्रवेश मिळालेला नसावा याची देखील काळजी घ्यायची आहे.

ज्या विद्यार्थ्यांस असतील तर मागास बहुजन कल्याण आहे त्या सदर योजनेचा लाभ अनुदेय नसेल याची काळजी घ्यायची आहे. विद्यार्थी कोणत्याही प्रकारचे नोकरी व्यवसाय करत नसावा याची देखील काळजी घ्यायची आहे.

तसेच विद्यार्थी व शैक्षणिक संस्थांनी सदर योजनेमध्ये फसवणूक केल्यास आढळल्यास तर संबंधित विद्यार्थी व शैक्षणिक संस्था कायदेशीर कारवाईस पात्र राहतील याची देखील नोंद घ्यायची आहे. (शासन निर्णय वाचा)

योजनेअंतर्गत दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी 4% समांतर आरक्षण किंवा शासन वेळ निर्धारित करेल त्याप्रमाणे असणार आहे.
दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी टक्केवारी कमाल 50% इतकी राहील,

यासाठी स्वतंत्र गुणवत्ता यादी तयार करण्यात येते. आता सदर योजनेत महिलांसाठी 30% समांतर आरक्षण शासन वेळोवेळी निर्धारित केलेले आहे.

आधार योजना लाभ घेण्यासाठी आवश्यक कागदपत्रे 2024 ?

  • भाड्याने राहत असल्याबाबत व स्थानिक रहिवासी नसल्याचे प्रतिज्ञापत्र [नोटरी]
  • कोणते शासकीय वस्तीगृहात प्रवेश घेतलेल्या नसल्याबाबतच शपथपत्र आवश्यक
  • स्वयंघोषणापत्र [दिलेली माहिती खरी व अचूक आहे याबाबत]
  • भाड्याने राहत असल्याबाबतचे भाडे चिट्ठी व भाडे करारपत्र, करारनामा इ.
  • महाविद्यालयात प्रवेश घेतल्याचा पुरावा अर्जदार लाभार्थी विद्यार्थ्यांचे आधार कार्ड
  • एससी, एसटी, ओबीसी मागासवर्गीय जातीचे कास्ट
  • विद्यार्थ्यांचे कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न प्रमाणपत्र आवश्यक
  • विद्यार्थी किंवा त्यांच्या पालकांचे बँक खाते पासबुक
  • अर्जदार विद्यार्थ्यांचे दहावी आणि बारावी मार्कशीट
  • महाविद्यालय विद्यापीठ कॉलेजमध्ये प्रवेश घेतलेल्या पुरावा

सावित्रीबाई फुले आधार योजना शिष्यवृत्ती कशी मिळणार 2024 ?

योजनेत पात्र विद्यार्थ्यांना खालील प्रमाणे अनुदान वितरित करण्यात येते. योजनेतून अनुदेय असलेले भोजन निवास व निर्वाह भत्तेचे पात्र विद्यार्थ्यांना आधारसलग्न बँक खात्यात संचालक स्तरावरील मध्यवर्ती खात्यामधून आगाऊ रक्कम जमा

करण्यात येते, आणि त्याचबरोबर योजनेअंतर्गत पात्र विद्यार्थ्यांना वितरित करण्याकरिता खालील तक्त्यात नमूद प्रमाणे वेळेत करण्यात यावी असा अपडेट आहे. आणि याचा जो काही स्क्रीन शॉट आहे खाली देण्यात आलेला आहे.

अनुदेय रक्कम संबंधित विद्यार्थ्यांच्या बँक खाते मध्ये जमा करण्यात येते, तसेच विद्यार्थ्यांच्या बँक खात्याशी त्यांच्या आधार कार्ड क्रमांक सलग्न करण्यात येतो.

या योजनेत लाभास पात्र असलेल्या विद्यार्थ्यांना इतर कोणताही भत्ता अनुदेय राहत नाही. विद्यार्थ्यांच्या महाविद्यालयात उपस्थिती किमान 75% आवश्यक [प्रत्येक तिमाही उपस्थित बाबतचे प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक असते.]

Aadhar Yojana Table Points

सावित्रीबाई फुले आधारित योजनेअंतर्गत कोणत्या शहरांसाठी भोजन पत्ता, निवास भत्ता, निर्वाह भत्ता, असे लाभ मिळतो, आणि तो किती रुपये मिळतो यासाठी खालील तक्ता पाहावा.

मुंबई, पुणे, इतर शहरांसाठी अनुदान रुपयांत

निवास भत्ता20,000 रुपये
भोजन भत्ता32,000 रुपये
निर्वाह भत्ता8,000 रुपये
एकूण लाभ60,000 रुपये

महानगरपालिका क्षेत्र अनुदान रुपयांत

निवास भत्ता15,000 रुपये
भोजन भत्ता28,000 रुपये
निर्वाह भत्ता8,000 रुपये
एकूण लाभ51,000 रुपये

जिल्हा अथवा तालुका अनुदान रुपयांत

निवास भत्ता12,000 रुपये
भोजन भत्ता25,000 रुपये
निर्वाह भत्ता6,000 रुपये
एकूण लाभ43,000 रुपये

वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQ)

ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना काय आहेत ?

गरीब OBC विध्यार्थी यांना वार्षिक शिक्षणासाठी 60 हजार रुपये दिले जातात.

ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना अंतर्गत कोणत्या शिक्षणासाठी लाभ मिळतो ?

योजनेचा लाभ घेण्यासाठी बारावीनंतरची उच्च शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना देण्यात येतो.

सावित्रीबाई फुले आधार योजना शिष्यवृत्ती कशी मिळणार 2024 ?

आधार योजना अंतर्गत स्कॉलरशिप हे एकुण 4 हफ्त्यामध्ये दिली जाते. 1 ला हफ्ता जून ते ऑगस्ट, 2 रा सप्टेंबर ते नोव्हेंबर, 3 रा डिसेंबर ते फेब्रुवारी, 4 था, मार्च ते मे या कालावधीत मिळतो.

Leave a Comment