11th Addmission Process 10वी परीक्षेत नापास झाला तरी 11वीत प्रवेश मिळणार मोठा निर्णय!

11th Addmission Process महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या फेब्रुवारी-मार्च २०२५ मध्ये घेण्यात आलेल्या दहावी परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर करण्यात आला आहे. यावर्षी दहावीच्या निकालात एकूण ९४.१०% विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून, मुलींचा निकाल ९६.१४% तर मुलांचा निकाल ९२.३१% आहे. यावेळी, महाराष्ट्र बोर्डाच्या अध्यक्ष शरद गोसावी यांनी पत्रकार परिषदेत निकालाची माहिती दिली.

दहावी नापास विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी

यंदा दहावीच्या परीक्षेत नापास झालेल्या विद्यार्थ्यांसाठी शिक्षण विभागाने एक मोठा निर्णय घेतला आहे. ज्या विद्यार्थ्यांना परीक्षेत अपयश आले आहे, त्यांनाही अकरावी प्रवेशाची संधी देण्यात येणार आहे. या निर्णयामुळे विद्यार्थी आणि पालकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

11th Addmission Process श्रेणी सुधार आणि गुण सुधार योजना

दहावी नापास विद्यार्थ्यांसाठी महाराष्ट्र बोर्डाने श्रेणी सुधार (Grade Improvement) आणि गुण सुधार (Marks Improvement) योजना सुरु केली आहे. या योजनेंतर्गत विद्यार्थी पुढील तीन परीक्षांमध्ये पुन्हा प्रविष्ठ होऊ शकतात. फेब्रुवारी-मार्च २०२५ मध्ये नापास झालेला विद्यार्थी जून-जुलै २०२५, फेब्रुवारी-मार्च २०२६ आणि जून-जुलै २०२६ च्या परीक्षेत पुनःप्रवेश घेऊ शकतो. यामुळे विद्यार्थ्यांना आपले गुण सुधारण्याची सुवर्णसंधी मिळाली आहे.

ATKT अंतर्गत 11वी प्रवेश प्रक्रिया

शिक्षण मंडळाने दहावी नापास विद्यार्थ्यांसाठी ATKT (Allowed To Keep Terms) प्रणाली लागू केली आहे. जर एखादा विद्यार्थी एक किंवा दोन विषयांत अनुत्तीर्ण झाला असेल, तरी त्याला अकरावीमध्ये प्रवेश घेता येईल. मात्र, बारावी प्रवेशासाठी त्याला दहावी पूर्णपणे उत्तीर्ण होणे गरजेचे आहे. ATKT अंतर्गत अकरावी प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांनी जून-जुलै २०२५ किंवा फेब्रुवारी-मार्च २०२६ या परीक्षांमध्ये उत्तीर्ण व्हावे लागेल, तेव्हाच ते बारावीला पात्र ठरतील.

दहावी निकालातील महत्वाचे मुद्दे

  • परीक्षेला बसलेले एकूण विद्यार्थी: १५,४६,५७९
  • उत्तीर्ण झालेले एकूण विद्यार्थी: १४,५५,४७७
  • नियमित विद्यार्थ्यांचा निकाल: ९४.१०%
  • दिव्यांग विद्यार्थी नोंदणी: ९,६७३
  • दिव्यांग विद्यार्थ्यांचा निकाल: ९२.२७%
  • सर्व विद्यार्थ्यांचा एकत्रित निकाल: ९३.०४%

शाळा आणि कॉलेज नियमांचे बदल

या वर्षापासून शाळा आणि कॉलेजच्या प्रवेश नियमांमध्ये काही बदल करण्यात आले आहेत. नवीन धोरणांनुसार, विद्यार्थ्यांना अतिरिक्त संधी देण्यात येणार असून, शैक्षणिक नुकसान होणार नाही याची काळजी घेतली जाणार आहे.

महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांसाठी ही मोठी संधी असून, नापास विद्यार्थ्यांनाही शिक्षणाची दुसरी संधी मिळणार आहे. अशा प्रकारे, शिक्षण विभागाने सकारात्मक निर्णय घेत विद्यार्थ्यांचे भविष्य सुरक्षित करण्याचा प्रयत्न केला आहे

Leave a Comment